रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने बकरी चोरांचा शोध घेवुन केली कार्यवाही...
रावेर तालुका प्रतिनिधी (प्रशांत गाढे )
रावेर पोलिस स्टेशन येथे दि. १२-१०-२०२५ रोजी गुरंन ४२५/२०२५ भा. न्या. संहीता कलम 303 (२) प्रमाणे बकरी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयात फिर्यादी नामे फिरोज खान अकबर खान वय ५३ रा. गांधी चौक रावेर यांनी दि. १२/१०/२०२५ रोजी त्यांची मालकीवी दोन बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने वोरुन नेले असल्या बाबत रावेर पोस्टे येथे गुन्हा दाखल आहे.
(ads)
सदर गुन्हा दाखल होताच गुन्हयाच्या एकंदर तपासात मा. पोलिस निरीक्षक सो यांनी रावेर गुन्हे शोध पथकास सुचना दिल्यावरुन आरोपीताच्या शोधास संपर्ण भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच गुप्तबातमीदारा व्दारे माहीती घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरुन आरोपीताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले व आरोपी क्र. ०१) जितेन मदन सोळंकी, वय १९ रा. रसलपुर ०२) राजु मोहन भिलाला क्य २१ रा. केन्हाळा ता. रावेर यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयावी कबुली देत गुन्हयातील चोरीच्या १३,०००/-रुपये किमतीच्या दोन बकऱ्या त्याच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
(ads)
सदर गुन्हयात आरोपीतांना अटक करुन मा. न्यायालयात दोन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो पोलिस अधिक्षक जळगांव, मा. श्री अशोक नखाते सो अप्पर पो. अधिक्षक जळगांव विभाग, मा.श्री अनिल बडगुजर सो पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन सवेर मधील पो. नि. डॉ विशाल जयस्वाल, गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भूषण सपकाळे, म.पो.शि उपा मशाने यांनी आरोपीतावा शोथ घेतला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहेकों हमीद तडवी हे करीत आहेत.



