ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मतदान जनजागृती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जे बी अंजने होते. अध्यक्षीय भाषणात या प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी लोकशाहीत मतदान करणे खुप महत्वाचे असते म्हणून सर्वांनी मतदार यादीत आपल्या नांवाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच मतदान करणे हा आपला हक्क व कर्तव्य आहे असे मा. प्राचार्य यांनी आवाहन केले.जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे.
(ads)
आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. यावेळी प्रा हेमंत बाविस्कर यांनी मतदार दिनानिमित्त शपथ दिली. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ सतिश वैष्णव, डॉ जे पी नेहते, प्रा एस बी महाजन, प्रा व्ही एच पाटील, ,डॉ एम के सोनवणे, ॠषीकेश महाजन, हर्षल पाटील, श्री गोपाल पाटील, श्री नितीन महाजन, श्री सहदेव पाटील इ. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सतिश वैष्णव यांनी केले



