यावल ( सुरेश पाटील ) बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तसेच यावल पो.स्टे.पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील ख्वाजा मशिदीचे बाजूस असलेल्या अवैध कत्तलखान्याजवळील "कच्चे मास" विक्रीच्या वेगवेगळ्या ४ दुकानातून १५ हजार रुपये किमतीचे ७५ किलो वजन असलेले "कच्चे मास" व इतर साहित्य यावल पोलिसांनी जप्त करून ७ संशयित आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला.
(ads)
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की,सोमवार दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७:४५ वाजता यावल शहरात यावल चोपडा रोडवरील ख्वाजा मशिदीचे बाजूस असलेल्या नगरपालिकेच्या जुन्या कत्तलखान्याचे जागी संशयित आरोपी१) गनी साबीर खान कुरेशी वय-३० वर्षे रा. डांगपुरा यावल जि.जळगाव व त्याचे साथीदार नामे २) इरफान खान दाउद खान वय ३५ वर्षे रा. बाबानगर यावल,३) शकील खान निसार खान कुरेशी वय-५१ वर्ष रा. डांगपुरा यावल,४) सैय्यद रशीद सैय्यद निसार कुरेशी वय ४५ वर्ष रा.डांगपुरा यावल,५) सैय्यद सरजीद सैय्यद शकील वय-२७ वर्ष रा.डांगपुरा यावल,६) कसाई अलफान खान अलफ खान वय ३१ वर्षे रा.डांगपुरा यावल, ७) अल्ताफ खान शकील खान वय २७ वर्ष रा.डांगपुरा यावल यांच्या वेगवेगळ्या ४ कच्चे मास विक्रीच्या दुकानातून १५ हजार रुपये किमतीचे एकूण ७५ किलो वजनाचे कच्चे मास व इतर साहित्य जमा करून संशयीत यातील नमूद ७ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ ( २०१५ चे सुधारणांसह ) कलम ६ .९ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एसआय विजय पाचपोळ,हे.कॉ.राजेंद्र पवार हे करीत आहे.संशयित ७ आरोपींना अटक करण्यात आली नसली तरी त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
(ads)
अवैध "कच्चे मास" विक्रीचा गोरख धंदा ( कत्तलखाना ) यावल नगरपालिका कार्यालयापासून व यावल तहसील कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर तसेच पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर सर्रासपणे सुरू असताना आज पर्यंत यावल पोलिसांच्या गोपनीय विभागाला याबाबतची माहिती नव्हती का..? आणि कारवाई का केली गेली नाही..? असा प्रश्न उपस्थित केला जात असून यापुढे त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळाचे बाजूला शासनाच्या अटी शर्ती खड्ड्यात घालून अवैध कत्तलखाना सुरू राहणार आहे किंवा नाही याबाबतचा खुलासा जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या माहितीसाठी नगरपालिकेने जाहीर करायला पाहिजे अशी मागणी संपूर्ण यावल परिसरातून होत आहे.
(ads)
याच प्रमाणे यावल शहरात यावल नगरपालिकेच्या सर्व अटी शर्तीचे उल्लंघन करून ठिकठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला चिकन सेंटर,बकरी,बोकड,मेंढीची कत्तल करून बेकायदा मटन विक्री, चिकन विक्रीची दुकाने सर्रास,बेकायदा सुरू आहे त्यांच्यावर कारवाई कोण आणि केव्हा करणार..? याकडे सुद्धा शाकाहार करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून आहे.



