शिरपुर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविदयालयाच्या पहिल्या वर्षाच्या जळगाव जिल्हा विद्यार्थी संघटने तर्फे आर. सी. पटेल अनु. प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना फराळाची वाटप करुन लहान चिमुकल्या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. फराळ वाटपा नंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदा समाधान देणारा होता. गोरगरीबांसोबत दिवाळी साजरी करा. कोणीही दिवाळीच्या आनंदा पासुन दुर राहाता कामा नये .आपापल्या परिसरात अथवा शेजारी दिवाळीच्या आनंदा पासुन वंचित राहणार नाही. तसेच कोणीही भुकेला झोपणार नाही यासाठी समाजाने जागृकतेने माणुसकी दाखवण्याचे आवाहन विद्यार्थी संघटनेचे भगतसिंग नरवाडे यांनी केले आहे.
(ads)
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आर. एस. कुलकर्णी ,डी. जे. वाघ, एन. आर. कोळी, एन. आर. बागूल, के. के. बराडके,ए. सी. परदेशी सह शिक्षकवृंद उपस्थित होते. सोबत जळगाव विदयार्थी संघटनेचे भगतसिंग नरवाडे, देवेश राणे, हितेश पाटील, सौरभ पाटिल, धनंजय चौधरी, हर्षल महाजन, दुर्गेश जंगले, विवेक पाटील, भावेश पाटिल, वेद गुर्जर, कृष्णा पाटिल, आदित्य पाटिल, कुणाल पाटिल, दुर्गेश पाटील, ओम महाजन, मयुर महाजन, ओम पाटील, मुकेश माळी सह जळगाव विद्यार्थी संघटना बहुसंख्येने उपस्थित होती.
(ads)
दिवाळी निमित्त फराळ वाटप या आदर्श उपक्रमाद्वारे मुलांसोबत आनंद लुटण्यात आला. समाजातील सकारात्मक बदलासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशाच उपक्रमांद्वारे जळगाव संघटना पुढेही समाजकार्यात सक्रिय राहील असे आश्वासन विद्यार्थी संघटनेचे भगतसिंग नरवाडे यांनी दिले.



