ऐनपूर महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यासाठी शासनाच्या व विविध अशासकीय आस्थापनांच्या शिष्यवृत्ती योजनाच्या बद्दल माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या संकल्पनेतून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्तपणे करण्यात आले.

(ads)

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पी. आर. महाजन यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. विनोद रामटेके यांनी कार्यक्रमाची ओळख करून दिली त्यानंतर प्रा. हेमंत बाविस्कर यांनी शिष्यवृत्त्या व विद्यार्थी या मधील दरी तसेच विद्यार्थ्यांनी उपलब्ध शिष्यवृत्त्याचा जास्तीत जास्त उपभोग घ्यावा जेणेकरून पैश्या अभावी शिक्षणात खंड पडता कामा नये यावर भर दिला. यानंतर प्रा. डॉ. संदीप साळुंके यांनी आपल्या तांत्रिक व्याख्यानात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रे कसे स्कॅन करावे तसेच मोबाईल चा वापर करून कसे ते हव्या त्या ठिकणी तसेच विविध माध्यमात साठविता येतात यांचे प्रत्याक्षित द्वारे दाखविले.

(ads)

 विद्यार्थ्यांनी त्याची स्कॅन झालेली कागदपत्रे पेनड्राईव्ह, जीमेल, गुगल ड्राईव्ह, तसेच इतर ठिकाणी कशी साठवावी यांचे प्रशिक्षण दिले. यानंतर प्रा. प्रदीप तायडे यांनी विविध अशासकिय आस्थापनांच्या शिष्यवृत्यांची माहिती दिली. यानंतर प्रश्नोत्तरांच्या सदरात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न व समस्या विचारल्या त्यावर वक्त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचा शेवट कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पी. आर. महाजन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आजच्या काळात पैश्या अभावी शिक्षण न घेण्या ऐवजी उपलब्ध विविध योजनाच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाची वाट सुखकर करावी असा संदेश दिला. 

(ads)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक पी. आर महाजन, प्रा. हेमंत बाविस्कर, डॉ. विनोद रामटेके, डॉ. संदीप साळुंके, प्रा. पी. आर. गवळी, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, श्री. रोहित चौधरी, श्री. ऋषिकेश महाजन, श्री. सौरभ पाटील, श्री. हर्शल पाटील, श्री. श्रेयस पाटील, श्री. महेंद्र महाजन यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!