यावल ( सुरेश पाटील )
यावल येथील सुतारवाडा भागातील रहिवासी प्रमोद देवरे याचा मुलगा योगेश देवरे या तरुणाची महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल संघात निवड झाली आहे.
योगेश देवरे यांनी जळगाव सघाचे सलग ३ वर्ष प्रतिनिधित्व केले आहे आणि महाराष्ट्र संघात याच्या आधी २ वर्ष खेळला आहे,योगेश देवरे हा जळगाव जिल्ह्याच्या संघाकडून खेळत आहे तेथे त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याला राज्य संघात संधी मिळाली.योगेश देवरे हा गाझियाबाद,दिल्ली व उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.यावल तालुक्यात शूटिंगबॉल या क्रीडा प्रकारात एवढी मोठी झेप घेणारा तो एकमेव खेळाडू आहे.
(ads)
त्याला संघ कोच म्हणून मोहम्मद शोयेब,शेख युनूस सर जामनेर यांचे मार्गदर्शन तर विशेष मार्गदर्शन हरिष खाचणे व अमोल सोनवणे यांचे लाभले आहे माझ्या या निवडीचे सर्व श्रेय माझ्या आई वडीलाचे आहे या खेळात चमकदार कामगिरी करुन आपल्या यावल शहराचे व माझ्या सघाचे नाव नक्की मोठ करेल असे योगेश देवरे यांनी सागीतले या निवडीबद्दल खेळाडूंनी व यावल परिसरातून सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



