रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत रावेर तालुक्यातील वाघोड गावचे लोकनियुक्त सरपंचांच्या पत्नी मीराबाई संजय मशाने यांनी अनुसूचित जागेसाठी राखीव असलेल्या वाघोड गटातून उमेदवार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांचे पती, विद्यमान सरपंच संजय मशाने यांनी वाघोड गावासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण उपाययोजना आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचे कार्य पाहता, मीराबाई मशाने यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण गटाचे लक्ष लागले आहे.
(ads)
सरपंच संजय मशाने यांच्या नेतृत्वाखाली वाघोड गावाने अनेक विकासाचे टप्पे पार केले आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वाघोड गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. याच विकासकामांची प्रेरणा घेऊन आणि हीच विकासगंगा जिल्हा परिषद गटातील इतर गावांपर्यंत पोहोचवण्याच्या निर्धाराने मीराबाई मशाने निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
(ads)
नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर, वाघोड गट असलेला जिल्हा परिषद अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असले तरी, एका प्रतिष्ठित नावाच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
वाघोड गावाचे विद्यमान सरपंच यांच्या पत्नीच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राजकीय गोटात होत आहे. सरपंचांचा दांडगा जनसंपर्क आणि वाघोड परिसरातील त्यांची राजकीय पकड लक्षात घेता, त्यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
(ads)
सरपंचांनी यापूर्वी केलेल्या विकासकामांचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा अनुभव पत्नीच्या पाठीशी उभा राहणार आहे.या गटातील स्थानिक राजकारण, जातीचे समीकरण आणि सरपंचांचा वैयक्तिक प्रभाव पाहता, ही उमेदवारी विरोधकांना मोठी टक्कर देऊ शकते. असेही जनमानसात बोलले जात आहे.महिला राखीव गटातून एक सक्षम आणि परिचित चेहरा म्हणून या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.



