जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज — संघटनात्मक ताकदीने लढणार - शमिभा पाटील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



प्रस्थापित घराणेशाहीचे व भांडवलशाहीचे राजकारण मोडून काढण्यात व सर्वसामान्यांचा गाव गाड्यांचा विकास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज — संघटनात्मक ताकदीने लढणार - शमिभा पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  जळगाव जिल्ह्यात येऊ घातलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद) लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी (VBA) ने जिल्हा पातळीवर तयारीचा बिगुल वाजवला आहे.

(ads)

आज आयोजित झालेल्या जिल्हा -तालुका कार्यकारिणी बैठकीत पक्षाने स्पष्ट केले की, आगामी निवडणुका या केवळ सत्ता मिळविण्याचे नव्हे तर वंचित, बहुजन, ओबीसी, तृतीयपंथी, महिला व युवा वर्गाच्या प्रतिनिधित्वासाठीच्या लढाईचा भाग आहेत. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या ताकदीवर, संघटनशक्ती व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर लढणार आहे.

(ads)

बैठकीत जिल्हा, तालुका आणि नगर पातळीवरील सर्व आघाड्यांच्या जबाबदाऱ्या ठरविण्यात आल्या असून प्रत्येक स्थानिक संस्थेत जमिनीवर मजबूत संघटन बांधणी, मतदारांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस लढा या तिन्ही अंगांनी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


वंचित बहुजन आघाडीचा उद्देश — राजकीय सत्ता ही समाजबदलाचे साधन ठरावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थाने वंचित समाजाच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख बनाव्यात, हा आहे.

(ads)

या पार्श्वभूमीवर, पक्षाचे जिल्हा संयोजक, विभागीय पदाधिकारी, महिला, युवा, विद्यार्थी, आघाड्या यांच्या संयुक्त सहभागाने निवडणूक तयारीचा आराखडा ठरविण्यात आला असून आगामी काळात प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक दौरे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे व उमेदवार निवड प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

(ads)

वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज भुसावळ येथे शासकीय विश्राम गृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, उपाध्यक्ष राहुल इंगळे, जिल्हा सचिव रफिक बेग, विश्वनाथ मोरे, संघटक बबन कांबळे व सदस्य, तसेच वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुलतान भाई तडवी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे , जिल्हा महासचिव वंदनाताई आराख भुसावळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष, बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा भाऊ निकम तालुका सचिव सुभाष भाऊ इंगळे, यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे, तालुका सचिव भाऊ सोनवणे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर, तालुका महासचिव, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, युवा तालुकाध्यक्ष योगेश दादा सुरवाडे, भुसावळ तालुका अध्यक्ष निलेशभाऊ, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख धीरज मेघे... वंचित बहुजन युवा आघाडी, महिला आघाडी तसेच कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते

(ads)

बैठकीचा समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!