रावेर पोलीस स्टेशन ला सन 2021 मध्ये दि. 29/11/2021 रोजी दाखल गुरनं- 392/2021 भादवी कलम 302,323,504 मध्ये दाखल गुन्हयात पाल शिवार येथे आरोपी नामे दिनेश उर्फ शिवा अनजा बारेला वय-26 याने त्याचे वडील नामे- अनाजा भारत्या बारेला यांनी जेवन करुन घे असे म्हटले असता आरोपी याने काय भाजी केली असे विचारले तेव्हा मयत वडीलांनी जेवनात उडदाची दाळ केली असे सांगीतल्याने याचा राग येवुन संतापात खाटीच्या माच्याने निघुन खुन केलेला होता. मयताची मुलगी बनाबाई नरसिंग बारेला हिचे फिर्यादी वरुन सदर चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(ads)
सदर गुन्हयाच्या तपासात तपास अधिकारी पो.उप. निरीक्षक सचिन नवले, सपोनि. शितलकुमार नाईक यांनी गुन्हयाचा तपास केलेला असुन सदर गुन्हयात फिर्यादी, पंच, साक्षीदार यांचे जबाब महत्वाचे ठरले आहे. सदर खटल्यात एकुण सरकार पक्षातर्फ 16 साक्षीदार तपासण्यात आले होते व त्यात आरोपीची बहीण, जन्मदाती आई व त्याचा 10 वर्षापासुनचा जवळचा मित्र यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या आहेत. सदर गुन्हयात तपासात मदत करणारे भौतीक दुवे यांचा योग्य रितीने वापर करुन आरोपीतास शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
(ads)
आरोपी यास मा. न्यायालयाने भा. द.वी कलम 302,323 अन्वये जन्मठेपेची शिक्षा, भुसावळ येथील सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाउ सो. यांनी सक्त मजुरी व 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महीना साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(ads)
सदर गुन्हयाच्या तपासात मा.डॉ. श्री. महेश्वर रेडडी सो. पोलिस अधिक्षक जळगांव, मा.श्री. अशोक नखाते सो. अप्पू पो. अधिक्षक ज्ळगांव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहा. पो. अधिक्षक श्रीमती अन्पुर्णा सिंग, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि. शितलकुमार नाइक , पो.उप. निरीक्षक सचिन नवले, पो.हे. कॉ/ राजेंद्र राठोड, पो.कॉ / ईश्वर चव्हाण, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.कॉ/ नरेंद्र बाविस्कर, पोकाँ ईस्माईल तडवी, पो.कॉ/ मुकेश मेढे पैरवी अधिकारी कांतीलाल कोळी यांचा महत्वाचा सहभाग होता. सदर गुन्हयात सरकार पक्षातर्फ सहा. सरकारी अभियोक्ता श्री. मोहन दि. देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केला होता.



