यावल ( सुरेश पाटील ) "सातबारा कोरा" सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी 'काळी पट्टी' बांधून यावल तालुका प्रहार दिव्यांग संघटनेने यावल तहसील समोर अनुक्रमे चौथ्यांदा आंदोलन करून तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.
(ads)
दिलेल्या निवेदनात स्वाक्षरी करणार दिव्यांग बांधवांनी नमूद केले आहे की,शेतकरी,विधवा,शेतमजूर,मच्छीमार मंडपाल,ग्रामपंचायत कर्मचारी, व अन्यवंचित घटकांसाठी आपल्याकडे वारंवार आंदोलने करून सुध्दा सरकार यांनी दखल घेतली नाही दि. १८/०८ दि.०३/०९ व दि. १८/०९/२०२५ आणि आज शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी चौथे आंदोलन शेतक-यांच्या सरसकट कर्जमाफी व शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये हेक्टरी मदत करावी.ओला दुष्काळ जाहीर करावा कारण कपाशी,कांदा,केळी,ज्वारी, सोयाबीन ह्या सर्व पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असून शेतकऱ्यांवरआत्महत्या करण्याची पाळी आली आहे राज्यात आतापर्यंत सात लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे.अजून किती आया बहीणीचे कुंकु पुसण्याची ही सरकार वाट पाहत आहे ह्या झोपलेल्या सरकारने आता तरी जागे ने ही सरकार सरकार कडे आम्ही मागणी करत आहे.
(ads)
निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ पाटील,उपाध्यक्ष प्रतीक पाटील,साहेबराव पाटील, बाळकृष्ण चौधरी,भागवत चौधरी, भास्कर जावळे,जावेद पटेल, जितेंद्र पाटील,मिलिंद महाजन, रामदास पाटील,यादव राणे,रमेश आमोदे,विकास गाजरे,विमल मोरे, अशा कोळी,मीना देशमुख,कडू जयकर,हिरालाल बारेला,जितेंद्र चौधरी,किरण महाजन इत्यादी अनेक अपंग बांधवांनी स्वाक्षरी केली आहे.
यावल तहसील कार्यालयात आंदोलन कर्त्यांना पक्षपातीपणाची वागणूक..
यावल तहसील कार्यालया समोर विविध संघटना,राजकीय पक्षाचे आंदोलने,उपोषण होत असतात यावेळी काही प्रभावशाली संघटना किंवा राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते सरळ तहसीलदार यांच्या दालनात प्रवेश करून तहसीलदार यांच्या बाजूला उभे राहून निवेदन देतानाचे छायाचित्र काढतात,तर काही आंदोलन कर्ते उपोषण करते यांच्याकडून निवेदन प्रशासकीय इमारतीच्या प्रमुख गेट जवळ घेतले जातात ( निवेदन देतेवेळी काही प्रतिनिधी अधिकार नसताना बेकायदेशीरपणे तहसील मधील शिपायांना आदेश देतात की साहेबांना बाहेर बोलवा )
तर काही उपोषण कर्ते आंदोलन कर्ते यांना तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडच्या बाहेर उभे करून त्यांच्याकडून निवेदन स्वीकारण्यात येते याबाबत यावल तहसीलदार यांनी पक्षपातीपणा किंवा भेदभाव न करता सर्वांसाठी एकच कायदेशीर रीतसर नियम लागू पक्षपातीपणाची वागणूक बंद करावी अशी तालुक्यात सर्व स्तरातून मागणी आहे.



