२० किलो वजना इतका दिवाळीचा फराळ पाठवू शकता : डाक घराने केली सुविधा उपलब्ध

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 भारतातील,आपल्या घरातील दिवाळीचा स्वादिष्ट फराळ आता परदेशातील आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना पाठवा.

यावल ( सुरेश पाटील ) आपल्या भारत देशातून म्हणजे आपल्या घरातून परदेशातील आपल्या प्रियजनांना,नातेवाईकांना दिवाळीचा स्वादिष्ट फराळ पाठवण्याची खात्रीलायक सुविधा डाक घरा मार्फत सुरू केल्याची माहिती भुसावल विभागाचे डाक अधीक्षक यांनी अधिकृतरित्या दिली.

(ads)

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सण उत्सवांच्या परंपरेमध्ये दिवाळी सण फराळ आणि दिपोत्सावाने नागरिकांना सुखावणारा ठरतो. अशा आनंदाच्या क्षणात आपल्या परदेशातील प्रियजनांना डाक घरामार्फत दिवाळी फराळ पाठवून सहभागी करून घेता येणार आहे. अनेकांचे नातेवाईक,मित्र परिवार परदेशात असल्याने त्यांना काही कारणास्तव कुटुंबीयासोबत दिवाळी साजरे करणे शक्य होत नाही,परंतु पोस्टाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांचा आनंद वृद्धिंगत करण्यासाठी २० किलो वजना इतका फराळ डाक विभागाच्या पार्सल सुविधे मार्फत, कॅनडा,युएई,युके,सिंगापूर, ऑस्ट्रेलिया,रशिया,आयर्लंड सहित १२० देशातील प्रियजनांना अत्यंत वाजवी दरात पाठवता येणार आहे.

(ads)

पार्सलचे वजन आणि निवडलेल्या वाहतूक सेवा प्रकारानुसार डाक विभागाने दर निश्चित केले आहेत. याशिवाय शुसावळ प्रधान डाकघरात पोस्टमन घरी येऊन पार्सल घेऊन जातील तसेच नाममात्र किंमतीत पार्सल पॅकिंगची सुविधा ( PPU ) सुध्दा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना पार्सल पाठविताना पूर्ण सुविधा मिळणार आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या डाक कार्यालात संपर्क करावा असे आवाहन भुसावळ विभाग भुसावळ डाक अधीक्षक एम.एस.नवलू यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!