यावल ( सुरेश पाटील ) शहरात नवरात्रात म्हणजे अनुक्रमे नऊ दिवसात रोज सकाळी नियमितपणे सूर्योदयाच्या वेळेस दुर्गा माता दौड कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत दुर्गामाता दौडचे वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी माता-भगिनींनी उस्फूर्तपणे स्वागत आणि पूजन केले.
(ads)
श्री नवरात्रीउत्सव हा श्री शिवप्रतिष्ठांन हिंदुस्थानचे संस्थापक परमपुज्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या माध्यमातून जगदंबेच्या चरणी ही उपासना,व्रत रुपी दौड हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरात गावांमध्ये काढली जाते दौडचे उद्येश हे असे की राष्ट्रकल्याणासाठी ह्या समस्त हिंदुसमाजात पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्याच्या अधुऱ्या,अपुऱ्या इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांच्याच मार्गावर चालुन त्यांच्याच रक्तगटाचा बनावा त्यासाठी अश्या प्रकारे माता जगदंबेच्या चरणी श्लोकांच्या माध्यमातुन मागन मांगितले जाते.
(ads)
ज्या प्रमाणे माँ साहेब जिजाऊ यांनी या नवरात्रीच्या दिवसात राष्ट्रउद्धारासाठी दगदंबेच्या चरणी हे व्रत कठोरतेने पाळुन जगदंबेला मागन पुत्राच्या रुपात मांगीतल त्येच चित्तात ठेऊन समस्थ हिंदुसमाजाला भगव्या ध्वजाच्या छत्रछायेत एकत्र करुन संपुर्ण गावाला एक दिवशी गावाचा एक भाग व त्या मार्गक्रमात येणारे दुर्गा मातेचे मंडळ तिथे तिथे जाऊन ध्वजाचे पुजन केले जाते व शेवटच्या समारोपाच्या दसऱ्याच्या दिवशी समस्थ गावातील हिंदुसमाजाला एकत्रीत करुन महादौड काढली जाते समस्थ धारकरी हिंदुत्वावादी धर्मबांधव मोठ्या उत्साहात हे व्रत रुपी दौड मध्ये सामील होतात. अशाप्रकारे या दौंड कार्यक्रमाला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.



