(ads)
यावल शहरातील रहिवासी दानिश सईद पटेल यांचा साखरपुडा रविवारी सानिया तालेब पटेल रा. कोरपावली हिच्यासोबत होणार होता. दरम्यान या साखरपुड्याच्या छोटेखानी कार्यक्रमातच रूढी परंपरांना फाटा देत, हळद लावणे, हळदीचा कार्यक्रम करणे, त्यानंतर वरात आणणे व वायफळ खर्च करणे अशा सर्व बाबी आणि रुढीपरंपरा टाळून आपण साखरपुड्यातच छोटे खाणी निकाह लावून घ्यावा असा पुढाकार यावलचे कॉन्ट्रॅक्टर हाजी मुक्तार इसा पटेल यांनी घेतला आणि त्यांच्या या पुढाकाराला मोहम्मद रफीक पटेल कोरपावली यांनी सहमती दाखवली आणि वधू वर मंडळींच्या पालकांनी देखील संमती दाखवली व छोटेखानी कार्यक्रमात रूढी परंपरेला फाटा देत साखरपुड्यातच निकाह अर्थात विवाह संपन्न करण्यात आला.
(ads)
याप्रसंगी अजित गणी पटेल, नसिर गनी पटेल, सादिक गनी पटेल, वसीम सिकंदर पटेल, रमीज सिकंदर पटेल, न्याजुद्दीन हैदर पटेल, हाजी समद चांद पटेल, शरीफ इसा पटेल, इकबाल इसा पटेल, आबुतालेब अफजल पटेल, मुक्तार पिरन पटेल, रशीद नबाब पटेल, आसिक मोहमंद पटेल, मुनाफ रहेमान पटेल, महमंद पटेल आदींची उपस्थिती होती. एकूणच रूढी, परंपरांना फाटा देत पटेल कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.



