ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत वाढदिवस रक्तदान क्लब स्थापन करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते हे उपस्थित होते. त्यांनी वाढदिवस रक्तदान क्लब या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
(ads)
तसेच विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या वाढदिवसाला जवळच्या रक्तपेढीवर जाऊन रक्तदान केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले पाहिजे असे अध्यक्षीय समारोपात डॉ. वैष्णव यांनी सांगितले.
(ads)
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी तर आभार सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी एस. पी. उमरीवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन वैष्णव, डॉ. जे. पी. नेहेते, डॉ एस. ए. पाटील, डॉ. एम. के. सोनवणे, डॉ. व्ही. एन. रामटेके, एस. पी. उमरीवाड डॉ. पी. आर. गवळी, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



