आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी, शासन मान्यता संघटनेच्या नाशिक येथील कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चतुर्थ श्रेणी(गट-ड) कर्मचारी संघटनेची महत्वाची बैठक उत्साहात संपन्न झाली.
(ads)
या बैठकीत आदिवासी विकास विभागातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे एकत्रित संघटन तयार करण्यात आले. या प्रसंगी नाशिक विभागीय अध्यक्ष आर. के. तडवी, कार्याध्यक्ष महेश पाटील, राज्य कमिटी सदस्य कमलाकर पाटील व सचिन वाघ, तसेच अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे राज्य अध्यक्ष निशाल विधाते हे मान्यवर उपस्थित होते.
(ads)
बैठकीत नव्याने गठीत झालेल्या चतुर्थ कर्मचारी श्रेणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
(ads)
या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाच्या न्यायहक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



