रावेर–यावल तालुक्यात सट्टा, जुगार व गावठी दारूचा सुळसुळाट; पोलिस प्रशासनाचे पाठबळ ? वंचित बहुजन आघाडीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर; तात्काळ कारवाईची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



यावल (राहुल जयकार) : रावेर आणि यावल तालुक्यात सट्टा, पत्ते, जुगार, मटका तसेच गावठी दारू विक्री सारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अवैध व्यवसायांना स्थानिक पोलिस प्रशासनाचे मूक पाठबळ असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

(ads)

निवेदनावर जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील आणि तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये दररोज सट्टा, जुगार, मटका तसेच गावठी दारू विक्री उघडपणे सुरू असून, नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनदेखील ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

(ads)

फैजपूर, सावदा, यावल, न्हावी, किनगाव, गाते आदी भागांतील अनेक ठिकाणी हे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याची माहिती आघाडीकडून देण्यात आली. संबंधित ठिकाणी तात्काळ छापेमारी करून दोषींविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत, तसेच या धंद्यांना आश्रय देणाऱ्यांची गुप्त चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रसंगी रफिक बेग (जिल्हा सचिव), सुभाष गवळी (तालुका महासचिव), अरविंद गाढे (कार्यकारिणी सदस्य) यांच्यासह सलीम तडवी, राजूभाई तडवी, परसाडे, सचिन बाऱ्हे, दीपाली बाऱ्हे, धीरज मेघे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

(ads)

वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाने तात्काळ छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!