सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपुर येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत व्हावी यासाठी 'रन फाॅर युनिटी' एकतेसाठी दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
(ads)
पोलिस स्टेशन, निंभोरा व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निंभोरा व ऐनपूर परिसरातील अनेक विद्यार्थी , नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयात सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
(ads)
महाविद्यालयातील प्रांगणातुन एकता दौड सुरूवात झाली. त्यावेळी फैजपूर विभागीय पोलिस उप अधीक्षक मा.अनिल बडगुजर साहेब यांनी एकता दौड आणि राष्ट्रीय एकात्मता याबद्दल माहिती दिली आणि या रन फॉर युनिटी मध्ये क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतील असे घोषित केले. बक्षिस देणारे दाते - प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यास पहिले बक्षीस - ११००/-रु श्री काशिनाथ शामू पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ऐनपुर व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला दुसरे बक्षीस - ७००/-रु श्री अमोल महाजन सरपंच ग्रामपंचायत ऐनपूर आणि
तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला तिसरे बक्षीस - ५००/-रु ऐनपूर माजी उपसरपंच
प्रोत्साहन पर चौथे बक्षीस - ५००/- रु श्री काशिनाथ शामू पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, ऐनपुर यांच्या कडून दिली जातील असे जाहीर केले.
(ads)
ऐनपूर मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला भेट दिली व पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली व सर्व सन्माननीय अतिथी, पोलिस दल, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इतर सर्वजण महाविद्यालयात आले. सभेच्या अध्यक्ष स्थानी ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. आर. एन. महाजन आणि प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर उपविभागीय पोलिस उप अधीक्षक मा. श्री अनिल बडगुजर साहेब, पोलिस स्टेशन निंभोरा येथिल पोलिस निरीक्षक श्री हरीदास बोचरे साहेब आणि ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री श्रीराम नारायण पाटील व सेक्रेटरी श्री संजय पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच ऐनपुर गावचे सरपंच अमोल महाजन व सदस्य आणि ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केले. उपविभागीय पोलिस उप अधीक्षक मा.अनिल बडगुजर साहेब यांनी सभेला राष्ट्रीय एकात्मता आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना सांगितले तसेच मान्यवरांच्या हस्ते या रनिंग मध्ये क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.प्रथम क्रमाक तेजेश चौधरी रसलपूर दुसरा क्रमांक - गौरव रामेश्वर कांडवेलकर तिसरा क्रमांक सचिन मधूकर शिरतुरे चौथा क्रमांक - मोहित भरत सोनवणे
मिळविण्याऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. जे.पी. नेहेते यांनी केले.



