मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मुक्ताईनगर येथील श्री कॉलनीत पूर्णत:महिलांनी आयोजित केलेल्या वर्षावासाच्या कार्यक्रमाची सांगता शनिवार (दी.११/१०/२०२५) रोजी करण्यात झाली.
श्री कॉलनीत आंबेडकरी समूहातील बौद्ध महिलांनी एकत्र येत वर्षावासाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित 'भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथाचे सामूहिक वाचन महिलांकडून करण्यात आले होते.
समारोपाच्या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, पुषा सपकाळे,पंडित सपकाळे,विश्वनाथ मोरे,दिलीप पोहेकर,दीपक भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी रत्ना कोसोदे,थोरात,भगत,इंगळे,तायडे, कांचन गवई या महिलांनी मनोगत व्यक्त केले तर आभार प्रमोद इंगळे यांनी मानले.
कार्यक्रमास श्री कॉलनीतील बहुतांशी महिला हजर होत्या.



