निंभोरा येथे वर्षावास सांगता समारोपाला भरभरून प्रतिसाद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 निंभोरा येथे वर्षावास सांगता समारोपाला भरभरून प्रतिसाद


निंभोरा, ता.भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी निंभोरा (दीपनगर) येथे वर्षावास सांगता समारोपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या समारोपात प्रमुख अतिथींच्या रूपाने भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक के. वाय. सुरवाडे, जळगाव महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा संघटक बी.के. बोदडे, ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, सदस्य उल्हास बोरोले व सनी चाहेल,प्रमोद सुरवाडे,राहुल वाघ, दिनेश इखारे, रमेश खंडारे, जयंती अध्यक्ष मनीष सुरवाडे, पोलिस हवालदार व गायक संदीप बडगे आणि गायिका रजनी भारसके यांच्या सह तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

(ads)

कार्यक्रमाची सुरूवात भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाने झाली. रंजना भारसके यांनी बुद्धाचे गीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात आमंत्रित मान्यवरांचा स्वागत करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांची विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्याचे पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांचे हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संदीप बडगे व रजनी भारसके यांनी मधुर गाण्यांची सुरुवात केली, ज्याने उपस्थितांचा मनमोहित केला. 

(ads)

कार्यक्रमात केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे तीन महिने सतत पठण केले, त्याबद्दल सर्व महिलांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.

हा कार्यक्रम रमाई महिला ग्रुप, त्रिरत्न बुद्ध विहार, भारतीय बौद्ध महासभा, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सहकार्याने आयोजित केला गेला. उपस्थित लोकांच्या उत्साहाने कार्यक्रमास विशेष रंगत आणली.

(ads)

या समारोपामुळे निंभोरा गावातील समाजाच्या एकीला आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाला एक नवा हातभार लागला आहे. या समारोपाद्वारे स्थानिक लोकांसाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!