रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर नगरपालिकेने मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागात नसून दुसऱ्याच प्रभागात आल्याने मतदारांनी पालिकेत गर्दी करत अर्ज दिला. रावेर नगर पालिकेच्या ७० टक्के याद्या चुकल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
प्रभाग क्र. १ ते १२ मध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. यावेळी माजी नगरसेवक यांनी यादी दुरुस्तीसाठीचा दिलेला अर्ज रावेर नगरपालिकेचे कार्यालयीन प्रमुख कोकाटे यांनी नाकारल्यामुळे अजून नगर पालिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली. परंतु नंतर स्वीकारल्याने त्यावर पडदा पडला.
(ads)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष पंकज वाघ यांनी रावेर नगर पालिकेला अर्ज देत शहरातील सर्वच म्हणजे १२ प्रभागातील याद्या दुरुस्त करा अशी मागणी केली. त्यांनी दिलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, रावेर नगर पालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुक प्रशसानातर्फे प्रभाग क्र.१ ते १२ ची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु या मतदार याद्यांचे अवलोकन केले असता न. पा. प्रशासनाकडून मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता रावेर नगरपालिका प्रशासनातर्फे अंतीम प्रभाग रचना तयार करण्यात येवून आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी या प्रभाग रचनेस दि. ३० सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना झालेली केलेली आहे. विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागाची सीमांकन आखून दिलेले आहे. तेव्हा प्रारुप मतदार यादी तयार करताना प्रत्येक प्रभागाच्या सीमांकनामधील रहिवाशी असलेल्या मतदारांची नावे फक्त समाविष्ट करणे आवश्यक होते.
(ads)
मात्र, नगर पालिका प्रशासनाने प्रमान क. १ ते १२ यांच्या सीमाकंनाची पडताळणी योग्य पद्धतीने न करता प्रारुप मतदार याद्या तयार करताना इतर प्रभागामध्ये दुसरे प्रभागांच्या सिमांकनामधील मतदारांचे नावाचा सुध्दा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होवून मतदार हे रहिवास करीत असलेल्या प्रभागाची मतदार यादी तपासणी करीत असल्यावर देखिल त्यांना त्यांची नावे दिसून येत नसल्याने मतदारांची मोठी धांदल उडत आहे.
सदर निवेदन हे रावेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी, विभागीय आयुक्त, निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते ? ही पाहणे आता उत्सुकतेचे आहे.



