यावल ( सुरेश पाटील )
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल मधील विद्यार्थीनीनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय कला उत्सव स्पर्धा 2025 - 26 मध्ये घवघवीत यश संपादन केले.
(ads)
या स्पर्धेमध्ये मिताली किशोर कोल्हे,डिंपल अमीत पाटील, कल्याणी जितेंद्र फालक,वेदिका शरद धनगर,गुंजन सतिश तळेले या विद्यार्थीनीनी भाग घेतला होता. त्यात मिताली कोल्हे हिने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. व तिची नाशिक विभागीय स्तरावर निवड झाली.नाशिक विभागीय स्तरावर सुध्दा तृतीय क्रमांक मिळविला.या सर्व विद्याथीनीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, शिक्षण विभागीय अधिकारी सरोज पाटील माॅडम व आशिक हुसेन (ads) तसेच सर्व क्रेद्रप्रमुख ठाकुर सरतडवी सर,गोजखान सर , चौधरी सर,नेहेते सर,गोहील माॅडम व सातघरे मॅडम शाळेचे अध्यक्ष शरदभाऊ महाजन,संचालक मंडळ व प्राचार्या रंजना महाजन मॅडम व प्राचार्या दिपाली धांडे मॅडम*शिक्षक व शिक्षेकेतरकर्मचारी यांनी विद्याथीनीचे कौतुक केले व गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.



