बोरमाळी पडा - मोहमांडली येथील आदिवासी कुटुंबांना मूलभूत सुविधा कधी पुरवणार.? आर. पी. आय चे यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वाखाली रावेर तहसील येथे बोरमाळी पाडा येथील नागरिकांचा मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी (प्रशांत गाढे )

रावेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहमांडली - बोरमाळी पाडा येथील नागरिकांच्या विविध समस्या साठी रावेर तहसील येथे राजू भाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी आय यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून मा. तहसीलदार यांना निवेदन देऊन ग्रामस्थांना होत असलेल्या समस्या मांडण्यात आल्या बोरमाडी पाड्यावरील नागरिक हे शेतमजुरी करून जसे तसे आपले पोट भरत आहे व आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत आहे गेल्या पिढ्यानपिढ्या त्यांच्या या गावात गेल्या असून त्यांना अजून सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळालेल्या नाही. 

(ads)

अनेक पिढ्या यांच्या गावामध्ये गेल्या असता अजूनही त्यांच्या नावे जागा करून देण्यात आल्या नाहीत. सदर गावामध्ये पिण्याच्या पाणी सुद्धा मिळत नाही. गावामध्ये एक हापसी असून ती देखील बंद अवस्थेत होती नागरिकांनी स्वखर्चाने मोटर आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु मोहमंडली ग्रामपंचायतची गावातील मोटर खराब झाली असता पाड्यावरील मोटार काढून मोहमांडली गाव मध्ये नेऊन बसण्यात आली संबंधित सरपंच यांच्या घरी जाऊन नागरिक प्रश्न विचारू लागले की आम्ही आमच्या खाजगी स्वतःखर्चातून आणलेली मोटार तुम्ही का घेऊन आलात.? या संदर्भात सरपंच यांचा मुलगा याने ताकीत दिली माझ्या घरी कोणीही यायचे नाही. असे उत्तर देऊ ग्रामस्थांना हाकलून लावले ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी संगनमत करून पाड्यातील नागरिकांना त्रास देत आहे.

(ads)

 पाड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सदरील पाड्यावर प्रशासकीय अधिकारी डोळ्यांनी सुद्धा या लोकांना दिसलेला नाही. सदरील गावामध्ये अंगणवाडी नाही,अशा सेविका येत नाही, त्यांच्या मूलभूत सुविधांकडे कोणीही लक्ष देत नाही व रेशन दुकानदार त्यांना पुरेसे धान्य देत नाही संबंधित नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पाणी डोक्याच्यावर गेले असता नागरिकांनी मा.राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विष्णू भाऊ पाराधे यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांना विश्वास देऊन तुमच्या प्रश्नांसाठी उभे राहून आपले मूलभूत अधिकार आपणास मिळवून देऊ अशी आश्वासन देऊन सदर रावेर तहसील येथे मोर्चा काढण्यात आला.

   (ads)

          स्वत्रंत भारत होऊन 78 वर्षी झालेली असताना देखील अजून ही आदिवासी बोरमाडी पड्यावरील नागरिक हक्कचे पक्के घर,रेशन,पाणी, अश्या समस्या असून त्यांना मूलभूत सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे.तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित नागरिकांना हक्काचे घर,रेशन व पाणी या मूलभूत सुविधांवर लक्ष द्यावे व त्यांच्या समस्या मार्गी लावाव्या अशी आरपीआय चे तालुका अध्यक्ष विष्णू पाराधे व बोरमाडी पाडा येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!