जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल  ( सुरेश पाटील )

आज दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रिन्सिपल रंजना महाजन मॅडम व दिपाली धांडे मॅडम उपस्थित होत्या. अध्यक्षाच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

(ads)

तसेच शाळेच्या शिक्षिका कविता पाटील मॅडम यांनी अब्दुल कलाम यांच्या महान कार्याविषयी विषयी थोडक्यात माहिती सांगितली.सर्व विद्यार्थ्यांनी मराठीतून लेखाचे वाचन केले.

या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरूड मॅडम यांनी उपस्थिती दिली. तसेच हा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!