सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत तंबाखू मुक्त अभियान व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो पी. आर. महाजन यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. प्रदीप तायडे यांनी आजच्या तरुणाईला बरेच व्यसन जडलेली आहेत आणि या व्यसनांपासून मुक्त होणे गरजेचे आहे.म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
(ads)
तंबाखू, नशेली पदार्थ, गुटक्याचे सेवन न करता व्यसनापासून मुक्ती मिळवली पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना एककाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी महाविद्यालयीन युवकांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन, नशा न करता ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तकांचे वाचन करून अभ्यास करायचा आहे व आपले करिअर करायचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एच.एम. बाविस्कर यांनी केले.
(ads)
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. व्ही. एच पाटील, डॉ. पि.आर. गवळी प्रा. एच.एम. बाविस्कर, प्रा. पी. आर. महाजन, प्रा. प्रदीप तायडे, यांनी सहकार्य केले.आभार प्रा. डॉ. एस. एस. साळुंके यांनी केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



