यावल ( सुरेश पाटील )
यावल येथील श्री व्यास मंदिरात दि.७ ऑक्टोबर २०२५ पासून म्हणजे अश्विनकृ १ प्रतिपदेपासून भल्या पहाटे काकड आरती करण्यात येत असून भाविक मोठया संख्येत उपस्थित राहुन काकड आरती सुरेल आवाजात म्हणतात.काकड आरती मध्ये श्री गणपतीची श्रीरामाची, श्री आत्मारामाची.श्रीशंकराची.श्री पांडूरंगाची आरतीचा समावेश असून नंतर पुष्पांजली म्हणत हरे राम हरे कृष्णाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. बुधवार दि.२२ रोजी श्री महर्षी व्यास महाराज यांना पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर छप्पन निरनिराळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
(ads)
यावेळेस महिला भाविक सुध्दा मोठया संख्येने उपस्थित होत्या. नैवेद्य आरतीनंतर नियमीत आरती करण्यात येऊन तद्नंतर छप्पन भोग प्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला.यावेळेस कार्यक्रमास उपस्थित भाविकांनी एकमेकांस पाडवा निमित्त शुभेच्छा दिल्यात.
(ads)
या नंतर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बिल्लू महाराज पुजारी व आरती मंडळ यांनी प्रयत्न करत इतरांनी सहकार्य केले.



