विविध समाजातील विविध सण उत्सव प्रत्येक समाज हा साजरा करतो. एक संस्कृतीचा भाग म्हणून करायला सुद्धा पाहिजेत. पण त्याच सोबत जो अतिपणा समाजातील काही बाबी या काही लोकांकडून होत आहेत. त्या मात्र विचार करायला लावणाऱ्या आहेत. यावर यातील काही लोकांना जर समजून सांगायला गेले. तर आमचे आम्हाला कळत नाही काय? तुम्ही कोण सांगणारे? या प्रकारचे उत्तरे ऐकायला मिळतात. आपण त्यामध्ये आपण नेहमी होणाऱ्या काही सणांची वास्तविकता बघु.
(ads)
गोपाळकाला किंवा दहीहंडी या उत्सवामध्ये मोठी मोठी बक्षिसे असतात. काही मंडळे असतात जी यामध्ये सक्रिय रीतीने सहभाग घेतात. बक्षीस हे सुद्धा जिंकतात पण सोबतच यामध्ये अनेक जणांची हाडे सुद्धा मोडतात. काहीजण मनोऱ्यावरून पडून मरतात. तेव्हा खूप मोठे नुकसान हे त्यांच्या परिवाराचे आणि त्यांचे जीवनाचे होत असते.
(ads)
गणेश उत्सव यामधील मिरवणुकीतील गोंगाट ऐकला की, बहिरेपण हे वरदान वाटते. आजचे उत्सव आहे विना डीजेचे शक्यतोवर बघायला मिळत नाहीत. ह्या उत्सवात बहिरेपणाचे वरदान अनेकांना हा गोंगाट देत असतो. एवढेच नाही तर मिरवणुकीतील प्रकाशयोजनामुळे अनेकांना दृष्टीदोष सुद्धा निर्माण होतात. म्हणजेच जे पाच इंद्रिय आहेत त्यापैकी दोन इंद्रिय हे निकामी आपण करत असतो. याकरिता आपणाला ना कोणते बक्षीस मिळणार असते. ना देव आपणावर खूप खुश होणार असतो. मग आम्ही आमची पाच पैकी दोन इंद्रिय निकामी होईपर्यंत नाचावे. हा नियम कोणी काढला? आणि आपण याचे पालन काटेकोरपणे स्व इच्छेने करत असतो.
अनेक जण तर अनेक मिरवणुकीत जयंती उत्सवात जाताना स्वतःच्या दुचाकीला मोठा दंडा लावतात. त्याला मोठा झेंडा लावतात. यामधून मी किती आक्रमक आहे. ते पुढे रस्त्यावरील लोकांना दाखविले जाते.
(ads)
असे अनेक उत्सवाबद्दल बोलता येईल. या सर्व उत्सवांचा काळसाध्याय दिवाळी हा उत्सव या उत्सवामध्ये खूप कलात्मकता होती. जसे आकाश दिवे, खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करणे. अशा खूप चांगल्या गोष्टी पण होतात. लोक वर्षा मधून एक वेळ स्वतःच्या घरी सुद्धा जातात. मित्र आप्तेष्ट यांना भेटतात. हे खूप चांगले आहे पण याच सोबत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी यावर्षी सहा तरुण भाजून मृत पावले. त्याच सोबत काही जखमी सुद्धा झाले. सोबतच हवेचे संतुलन सुद्धा बिघडले. फटाक्याच्या कानठळ्या बसतील एवढा आवाज प्राणी पक्षी बालक आणि वृद्ध यांची काय अवस्था होते .याचा तर विचारच केला जात नाही.
काही लोक तर असे सण असले की घरातून बाहेर पडू की नको या दुविधे मध्ये असतात. काहीजण यामध्ये सामाजिक बेशिस्तपणा चा ऊन्माद पाहून धडकी भरावी असे वारंवार घडते.
(ads)
या अगोदर फक्त प्रदूषणासाठी दिल्ली शहराचा विचार केला जायचा. पण आता मात्र वायू आणि ध्वनी प्रदूषण हे सर्व शहरात बघायला मिळते. ही वास्तविकता आजच्या सर्व शहराची आहे.
आजच्या सणाचे आधुनिक स्वरूप हेच आहे. सण म्हणजे समुदाय आणि समुदाय म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यातील एकमेकांच्या जाणिवा चेतवण्या ची संधी. एवढ्या सोयीस्कर नजरेने या सांस्कृतिक सोहळ्याकडे अलीकडे समाजाकडून पाहिले जात आहे.
या दिवाळीमध्ये फटाक्यावर भारतीयांनी तब्बल 7000 कोटी रुपये एवढी रक्कम खर्च केलेली आहे. ही रक्कम शासनाचा जर विचार केला तर काही काही राज्याकरिता विकास कामासाठी एवढा निधी शासन जाहीर करते. आणि आपण सर्वसामान्य मात्र एवढ्या रकमेचा फटाक्याचा रूपात धुर करत असतो. काय आम्ही आमची मानसिकता करून ठेवली आहे?
(ads)
याच रीतीने जर आपण इथून पुढे आपले उत्सव साजरी करत राहिलो. तर हेच उत्सव आपल्यासाठी धोकादायक होतील. उत्सवामधून आनंद मिळतो आणि तो घ्यायलाच पाहिजे. पण तो इतरांना आणि स्वतःला विनाशकारी वेदनादायी अशा प्रकारचा नसावा. सन उत्सवा प्रति आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
प्रमोद पडघन
मानसोपचारतज्ञ
संपर्क 9075977239



