नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतून फैजपूर नगरपरिषदेला ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या साहाय्याने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेली नवी अभ्यासिका उभारली जाणार आहे.
फैजपूर शहरात उच्च दर्जाची व शांत वातावरणातील अभ्यासिकेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना योग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
(ads)
आमदार अमोलभाऊ जावळे यांना शिक्षण क्षेत्राशी विशेष जिव्हाळा असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही त्यांची सातत्यपूर्ण भूमिका आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या या अभ्यासिकेमुळे फैजपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणादायी व सुसज्ज वातावरण लाभणार आहे.
(ads)
या मंजुरीमुळे शहरात समाधानाचे वातावरण असून, नागरिक व विद्यार्थी वर्गाने आमदार जावळे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ही अभ्यासिका लवकरच अत्याधुनिक सुविधांसह ज्ञानकेंद्र म्हणून कार्यरत होणार आहे.



