ऐनपूर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा केला गेला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाने केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. 

(ads)

दिनांक १४ ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या ग्रंथ प्रदर्शन व कलाम यांची जयंती हा योग साधत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने वाचन साहित्याचा आस्वाद घेतला. खऱ्या अर्थाने वाचणाची प्रेरणा ग्रंथप्रदर्शना सारख्या उपक्रमांनी होते याचा प्रत्यय येथे आला ज्यात विद्यार्थी पुस्तके चाळताना मग्न झालेले दिसून आले. हे वर्ष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष असून या निमित्त संयुक्तपणे वाचन प्रेरणा दिवस आणि तीन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले त्यामध्ये मुख्यत्वे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्र तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन चरित्र यावरील ग्रंथ पुस्तके ठेवण्यात आलेली होती त्याचबरोबर अवांतर वाचनाची नावाजलेली पुस्तके विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल या उद्देशाने या ठिकाणी ठेवण्यात आलेली व ती विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे चालली याचा वाचकांच्या मनामध्ये सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून आला व ग्रंथ प्रदर्शन चे उद्दिष्ट सफल झाले असे म्हणता येईल.  

(ads)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सतीश वैष्णव, प्राध्यापक पी. आर महाजन, प्रा. हेमंत बाविस्कर, डॉ. विनोद रामटेके, डॉ. संदीप साळुंके, प्रा. पी. आर. गवळी, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, श्री. हर्शल पाटील, श्री. श्रेयस पाटील, श्री. महेंद्र महाजन तसेच कमवा व शिका योजनेतील विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!