सावदा प्रतिनिधी (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
वाघोदा थोरगव्हाण जिल्हा परिषद गट यंदा अनुसूचित जाती (महिला राखीव) प्रवर्गासाठी आरक्षित असून या गटातून सौ. अश्विनी पवन बाऱ्हे (उपसरपंच, उदळी बु.) यांची दावेदारी विशेष चर्चेत आहे. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर होत असून या गटातील एक सक्षम शिक्षित आणि जनसंपर्कात निपुण महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे
सौ. बाऱ्हे या पदवीधर शिक्षित महिला असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उपसरपंच पदावर काम करताना त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांत पुढाकार घेतला आहे. ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, आणि सामाजिक ऐक्य या क्षेत्रात त्यांनी केलेले काम सर्वांना जाणवणारे आहे
विकासाभिमुख दृष्टीकोन, तळागाळातील संपर्क आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे सौ. बाऱ्हे यांना सर्व समाजघटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाघोदा बु. गटातून सौ. अश्विनी पवन बाऱ्हे या एक सक्षम व कार्यक्षम महिला नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत, अशी चर्चा जनमानसात रंगत आहे.



