नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदनामीकारक आणि जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या व्हिडिओविरोधात वंचित बहुजन आघाडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नागपूर शहर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव इंजि. धम्मदीप लोखंडे यांनी यशोधरा नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत “राजकारण विदर्भाचे”, “मंच रामटेक” आणि “वर्धा लाइव” या फेसबुक पेजच्या एडमिनविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 299, 196, 357 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(r), 3(1)(s) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(ads)
या संदर्भात ACP ओव्हाळ साहेब (यशोधरा नगर विभाग) यांनी दोन दिवसांत साइबर सेलच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून एफआयआरची प्रत देण्याचे आश्वासन दिले आहे. या फेसबुक पेजवरून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि जातीय द्वेष पसरवणारे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. “प्रकाश आंबेडकर एक्सपोज सिरीज” या नावाने व्हिडिओची मालिका तयार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(ads)
२४ ऑक्टोबर २०२५ रोजी औरंगाबाद येथे RSS कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या जनआंदोलन मोर्च्यानंतर करण्यात आलेल्या सोशल मीडियावरील पोस्टच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तातडीने आरोपींवर कारवाई करण्यात यावी.
(ads)
या प्रसंगी शहर महासचिव इंजि. धम्मदीप लोखंडे यांच्यासह शहर उपाध्यक्ष अतुल गजभिये, शहर सचिव मंथन गजभिये, मोहम्मद कमालभाई अंसारी, आनंद लांजेवार, श्रेयश डोंगरे, विनय राम, प्रवेश वासनिक, निशांत पाटिल, अंशुमन शेंडे, सौरभ शेलारे, साहिल डोंगरे, सचिन आंबेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



