यावल शहरातील गणेशनगर मध्ये रस्त्यात शोष खड्डा : नगरपालिकेकडे तक्रार असताना दखल नाही

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



भावी उमेदवारांच्या मतदानावर होणार विपरीत परिणाम

यावल ( सुरेश पाटील ) नगरपालिका हद्दीत यावल शहरात गणेशनगर मधील रस्त्यात शोष खड्ड्यामुळे दुर्गंधी पसरली आहे गेल्या नऊ-दहा महिन्यात पासून यावल नगरपालिकेकडे लेखी तक्रार केली आहे.परंतु नगरपालिकेने अद्यापही दखल न घेतल्याने मुख्याधिकारी व स्वच्छता विभाग प्रमुख,साफसफाई कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा व निष्क्रियता दिसून येत असला तरी नगरपरिषद निवडणुकीत गणेशनगर मधून भाविक इच्छुक उमेदवाराच्या मतदानावर चांगलाच परिणाम होणार असल्याच्या चर्चेसोबत परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

(ads)

दि.२७ फेब्रुवारी २०२५ दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे की

यावल नगरपालिका हद्दीतील गट नं. ४५ प्लॉट नं २१/२२ समोरील रस्त्यात खोदुन ठेवलेल्या शोष  खड्डयात भयानक डासांची उत्पत्ती झालेली असून परिसरात खूप दुर्गंधी पसरत आहे त्यात सदरील शोष खड्डा पूर्णपणे भरलेला असून ओसांडून सदरील मलमूत्र युक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे सदरील शोष खड्यावर कुठलेहि झाकण अथवा आवरण नसून परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे, शोष खड्डा खोदलेल्या महाशयांना सदरील शोष खड्डा पूर्णपणे बंद करावा किंवा त्यांच्या हद्दीत गटार असुन त्या गटारीत तुमचे सांडपाणी सोडावे अशी तोंडी सूचना वजा विनंती करून काहीच उपयोग होत नाही,नाईलाजाने तक्रार करीत आहे. तक्रारीबाबत वारंवार गेल्या आठ ते दहा महिन्यापासून तोंडी तक्रार व प्रत्यक्ष भेटून कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे, 

(ads)

परंतु नगरपालिकेने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नसल्याने मुख्याधिकारी व स्वच्छता विभाग प्रमुख निष्क्रिय ठरत आहेत का असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.या शोष खड्ड्यामुळे डास उत्पत्तीमुळे गणेश नगर परिसरात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,तसेच शोषखड्डाखड्डा सार्वजनिक वापराच्या रस्त्यात असल्याने इतर कुठली हानी झाल्यास त्यास पूर्णपणे शोषखड्डा करणारा मालक असेल आणि त्यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास तेवढीच जबाबदारी यावल नगर पालिका सफाई आणि आरोग्य विभाग यांची असेल याची यावं नगरपालिकेने नोंद घ्यावी. सदरील शोषखेडा तात्काळ बंद न केल्यास पुढील कार्यवाहीस नगरपालिकेची संबंधित यंत्रणा जबाबदार राहील.तक्रारीचा लवकरात लवकर विचार करून नागरिकांची समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी गणेशनगर मध्ये नागरिकांनी केली आहे. 

(ads)

यावल नगरपरिषद निवडणूक होत असल्याने मतदानाच्या दिवसा पर्यंत या शोष खड्ड्याची दखल लोकप्रतिनिधी न घेतल्यास गणेश नगर मधून भावी उमेदवारांच्या मतदानावर विपरीत परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!