यावल ( सुरेश पाटील )
यावल येथील एसटीबस स्टॅन्ड आगाराजवळील मैदानावर शुक्रवार दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता ' वंदे मातरम' गीताचे सामूहिक गायन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तातडीने नियोजन करून ठेवण्यात आले.परंतु या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेळेवर म्हणजे किमान एक दिवस आधी प्रसिद्धी माध्यमातून न पोहोचल्याने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उपस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो..?
(ads)
' वंदे मातरम' गीताचे सामूहिक गायन महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाच्या वक्ता म्हणून श्रीमती भारती साठे असल्याचे निमंत्रक पत्रिकेत महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल प्राचार्य, तसेच एन व्ही चव्हाण जि.व्य.शि.व.प्र.अधिकारी यांनी नमूद केले असले तरी सदरच्या महोत्सवाची माहिती ही यावल शहर व परिसरातील नागरिकांना वेळेत न मिळाल्यामुळे ( एका सुज्ञ नागरिकांने दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान दिली.) आयोजक आणि संबंधित अधिकारी आणि महाराष्ट्र शासन वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन महोत्सव घेण्याबाबत सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी आणि कोणा कोणाला निमंत्रण पत्रिका दिल्या किंवा नाही, प्रसिद्धी माध्यमांना माहिती का दिली नाही..? याबाबत किती बेफिकर आणि उदासीन आहे हे दिसून आले आहे.



