अजिंठा :- अजिंठा लेणी स्थापत्य , शिल्प , चित्र या तीन कलांचा विलोभनीय संगम आहे . या लेणीच्या निर्मिती करिता असंख्य कलाकार रात्रंदिवस काम करीत होते . हे कलाकार नेमके कोण होते , कोणत्या भागातील होते , कोणत्या धर्माचे होते या विषयी मात्र काही माहिती उपलब्ध नाही . हे काम करीत असताना हे कलाकार कोठे राहत असावे ? असा प्रश्न निर्माण होतो . या अनुषंगाने अभ्यास करता आपल्याला असे दिसून येते की , लेणी लगत आज जे लेणापुर गाव आहे त्या गावात सुमारे सत्तर वर्षांपूर्वी जी विहीर आढळून आली त्या विहिरीत छन्नी , घन , हातोडी , घमेले , पहार , कढई , मोठा सराटा व अन्य काही वस्तू आढळून आल्याने ते कलाकार आताच्या लेणापुर गावी राहत असावे हे स्पष्ट होते . या वरून लेणापुर हे गाव त्या काळी अजिंठा लेणी च्या कलाकारांचे मुख्यालय होते असे आपण म्हणू शकतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
(ads)
दिनांक ५ नोव्हेंबर रोजीअजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव तर्फे अजिंठा लेणी च्या व्ह्यू पॉइंट वर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वाघ बोलत होते.
आपल्या भाषणात जयसिंग वाघ यांनी पुढं सांगितले की , या गावाचे लेणापुर हे नाव अजिंठा लेणी वरून पडलेले आहे . निसर्गसौंदर्याने नटलेल्या या गावातून लेणीला जाणारी पायवाट आहे . लेणीच्या लगत या गावाखेरिज दुसरे गाव नसल्याने त्या काळी ते कलाकार याच पायवाटेने आपल्या कामाकरीता जात असावे असे दिसून येते. लेणीचे काम झाल्यानंतर हे सर्व कलाकार इथून निघून गेल्याने हे गाव सुमारे १५०० वर्षे निर्मनुष्य होते . २०११ च्या जनगणने नुसार या गावाची लोकसंख्या फक्त ४५० असल्याचे दिसून येते . आजही या गावाची लोकसंख्या १५०० च्या आत आहे , अनेक सुविधांपासून हे गाव दूर आहे. तेंव्हा लेणापुर या गावी अजिंठा लेणीच्या कलाकारांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने एखादे स्मारक उभारावे असे आवाहन सुध्दा वाघ यांनी केले .
(ads)
या प्रसंगी डॉ. उल्हास तासखेडकर अध्यक्षस्थानी होते , विजया शेजवळे, ॲड. आनंद कोचुरे , पी. डी. सोनवणे , दिलीप तासखेडकर, ललित महीरे, डी. एम. भालेराव , नूतन तासखेडकर , उज्वला तायडे , यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव , प्रास्ताविक दिलीप सपकाळे , परिचय चेतन नन्नवरे , स्वागत सुमन बैसाणे , सुनंदा वाघ , मयुरी तासखेडकर , तर आभारप्रदर्शन कविता सपकाळे यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरवातीस सिंधू तायडे , वर्षा कोचुरे , पूजा कोचुरे , दीक्षा तासखेडकर , टिना सोनवणे यांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हटली , मीनाक्षी तायडे , दिव्या तायडे , यांनी वेगवेगळे विनोद सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली शेवटी आरती सोनवणे , प्रियंका सपकाळे , जमुणाबाई साळवे , वत्सलाबाई वानखेडे , साधना हिरोळे , आशा सपकाळे , यांनी बुद्ध व भीम गीत सादर केले व कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रमास जळगाव शहरातून तसेच लगतच्या गावातून बौद्ध उपासक , उपासिका मोठ्यासंख्येने हजर होते .



