आचारसंहितामुळे यावल शहरातील बेकायदा अनधिकृत बॅनर,फलक नगरपालिकेने काढले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) नगरपरिषद कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याने ठिकठिकाणी अधिकृत आणि अनधिकृत लावलेले फलक आणि बॅनर यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज काढल्याने यावल शहर जे विद्रूप झाले होते ते स्वच्छ आणि मोकळे झाले.

(ads)

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात आचारसंहिता जाहीर केल्याने यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज सकाळी यावल शहरात ठीक ठिकाणी गल्लीबोळात आणि प्रमुख रस्त्यावर बेकायदा तसेच अधिकृतरित्या लावलेले बॅनर फलक काढून टाकल्याने यावल शहराचा विद्रुपपणा सध्या दूर झाला आहे.

(ads)

 यामुळे नागरिकांमध्ये समाधानकारक रित्या बोलले जात आहे.फलक बॅनर काढण्याची कारवाई नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या व प्रभारी उपमुख्य अधिकारी यांच्या आदेशान्वये कार्यालय प्रमुख काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता  विभागातील कर्मचारी,मुकडदम, संकल्पना घारू तसेच त्यांचे सहाय्यक लखन घारू, शेख अन्सार शेख निसार,शेख इसरार, सतीश चव्हाण राहुल चव्हाण चंद्रकांत सारासर यांनी नगरपालिका क्षेत्रातील सर्व ठिकाणचे बॅनर फलक काढून ट्रॅक्टर मध्ये भरून जमा केले. 

(ads)

आचारसंहिता सुरू झाली परंतु काही पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले फलक बॅनर काढले नाहीत परंतु नगरपालिकेने फलक,बॅनर काढल्यानंतर ते फलक आमच्या कार्यकर्त्यां जवळ परत करा असे दूरध्वनीवरून नगरपालिका कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत लोकप्रतिनिधी व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना खाजगी,राजकीय, वैयक्तिक कामासाठी भ्रमणध्वनीवरून शासकीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो का..? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!