यावल ( सुरेश पाटील )
नगरपरिषद यावल सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात नामनिर्देशन दाखल करण्याचे ठिकाण व मतमोजणीचे ठिकाण निश्चित करण्यात आले असल्याची लेखी माहिती सह आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना देण्यात आली.
(ads)
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक संदर्भात नामनिर्देशन दाखल करण्याचे ठिकाण यावल नगरपरिषद कार्यालयात तसेच मतमोजणीचे ठिकाण यावल येथील सातोद रोडवरील नवीन प्रशासकीय इमारत ( तहसील कार्यालय यावल ) मध्ये केली जाणार असल्याची माहिती सह आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यावल यांनी दिली.



