ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी उत्तुंग यशाची नोंद केली आहे. कुमारी निकिता समाधान कोळी.तृतीय वर्ष (बी.एससी. रसायनशास्त्र)व मुस्कान युसुफ पटेल.तृतीय वर्ष (बी.ए. इतिहास) यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या एप्रिल–मे 2025 च्या परीक्षेत विद्यापीठ गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
(ads)
विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांमधून या दोघींनी आपल्या-आपल्या विषयात उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
(ads)
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.भागवत पाटील, उपाध्यक्ष श्री.आर.एन. महाजन, चेअरमन श्री.श्रीराम पाटील.तसेच सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एन. वैष्णव, रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.जे.पी.नेहेते, प्रा.एस.आर.इंगळे, डॉ.डी. बी.पाटील, इतिहास विभागाचे प्रा.अक्षय महाजन,प्रा.प्रदीप तायडे,मराठी विभागाचे प्रा.डॉ.एम.के.सोनवणे.यासोबत कला व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




