जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूल, फत्तेपूर मध्ये माझी शाळा, सुंदर शाळा या मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत केंद्रीय विद्यालय शिक्षक चमत्कार सादरकर्ते आणि नवप्रबोधनकार मिथुन ढिवरे यांचा "चमत्कार सादरीकरण आणि प्रबोधन" कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे चमत्काराचे प्रयोग करून दाखविले. यामध्ये खाली तांब्या मधून पाणी काढणे, हवेतून सोन्याची चैन काढणे, पाण्यावर दिवा पेटविणे, तांब्यामध्ये भूत पकडणे असे वेगवेगळे प्रयोग समाविष्ट होते.
(ads)
प्रयोग झाल्यानंतर मुलांमध्ये निरीक्षण क्षमता वाढावी म्हणून चमत्काराच्या मागील विज्ञान विचारले गेले. काही विद्यार्थ्यांनी अचूक निरीक्षण करून चमत्कारामागील विज्ञान सांगितले तर काही मुलांना सांगता आले नाही. म्हणून शेवटी मिथुन ढिवरे सरांनी प्रत्येक चमत्कार सादरीकरण आणि त्यानंतर त्याचा सविस्तर स्पष्टीकरण दिले.
(ads)
सदर कार्यक्रम फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील शाळेत आयोजित केलेला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री दिगंबर माळी सर होते. तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक अण्णा पाटील आणि पर्यवेक्षक एस पी बाविस्कर सर यांची होती. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील उपक्रमशील शिक्षक इब्राहिम शेख सर यांनी केले.


