ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने होते. तर प्रमुख वक्ते डॉ एस ए पाटील हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव, रावेर महाविद्यालयाचे प्रा डॉ सुतार, प्रा डॉ स्वाती राजकुंडल हे होते. या कार्यक्रमात डॉ एस ए पाटील यांनी सरदार पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
(ads)
तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी त्यांच्या बालपणापासून सपूर्ण आयुष्यबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला डॉ संदीप साळुंखे, प्रा व्हि एच पाटील, प्रा एस पी उमरीवाड, डॉ एन यु बारी, प्रा अक्षय महाजन, प्रा प्रदीप तायडे, प्रा. सौ रेखा पाटील उपस्थित होते.
(ads)
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री श्रेयस पाटील, श्री अनिकेत पाटील ,श्री सौरभ पाटील, श्री हर्षल पाटील, श्री रोहित पाटील, गोपाळ पाटील, नितीन महाजन, सहदेव पाटील,श्री ऋषिकेश महाजन यांनी मेहनत घेतली.


