रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेर व यावल तालुक्यात विशेष शासकीय दाखले व सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत ही शिबिरे गावोगावी आयोजित करण्यात येणार असून, दररोज दुपारी २.०० वाजता संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ मिळणार आहे.
(ads)
रावेर व यावल तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजना व दाखल्यांचा लाभ थेट गावातच मिळावा, या उद्देशाने आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महसूल विभागामार्फत हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या टाळता येणार असून वेळ व खर्चाची मोठी बचत होणार आहे.
(ads)
या शिबिरांमध्ये संजय गांधी योजना, लाडकी बहीण योजना, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखले तसेच विविध योजनांअंतर्गत आवश्यक असलेल्या e-KYC सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी-वाढ करणे आदी कामेही या शिबिरांत केली जाणार आहेत.
(ads)
रावेर तालुक्यात १६ डिसेंबर रोजी कुसुंबे बु. व कुसुंबे खु., १७ डिसेंबर रोजी लोहारा व चिंचोटी, १८ डिसेंबर रोजी नेरुळ, १९ डिसेंबर रोजी अजनाड व चोरवड, २२ डिसेंबर रोजी शिंदखेडा, २३ डिसेंबर रोजी पातोंडी व बोहर्डे, २४ डिसेंबर रोजी चिनावल, २६ डिसेंबर रोजी अंजदा व नांदुरखेडा, २९ डिसेंबर रोजी मुंजलवाडी व चुनाबर्डी, ३० डिसेंबर रोजी रमजीपूर, ३१ डिसेंबर रोजी कर्जोद, १ जानेवारी रोजी अभोडा बु. व अभोडा खु., २ जानेवारी रोजी थेराळा व धुरखेडा, ५ जानेवारी रोजी पाडळे बु. व पाडळे खु., ६ जानेवारी रोजी भोकरी, ७ जानेवारी रोजी तामसवाडी व बोरखेडा, ८ जानेवारी रोजी लालमाती व सहस्रलिंग, ९ जानेवारी रोजी मोहमांडली, अंधारमळी व तिड्या, तर १२ जानेवारी रोजी मंगरूळ येथे शिबिरे घेण्यात येणार आहेत.
(ads)
यावल तालुक्यात १५ डिसेंबर रोजी भालोद, १६ डिसेंबर रोजी न्हावी प्र. यावल, १७ डिसेंबर रोजी वाघळूद, १८ डिसेंबर रोजी भालशिव, १९ डिसेंबर रोजी पिंप्री, २२ डिसेंबर रोजी अट्रावल, २३ डिसेंबर रोजी राजोरा व मायसांगवी, २४ डिसेंबर रोजी निंबगाव टेंभी., २६ डिसेंबर रोजी बोरखेडा बु., २९ डिसेंबर रोजी आमोदा, ३० डिसेंबर रोजी वढोदा, कारंजी व रिधुरी, १ जानेवारी रोजी दुसखेडा, २ जानेवारी रोजी पाडळसा, ५ जानेवारी रोजी चारमळी, ६ जानेवारी रोजी बोरावल बु., ७ जानेवारी रोजी पिंपरुड आणि ८ जानेवारी रोजी आसारबारी येथे ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
(ads)
या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केले आहे.

