रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत कागदपत्रे गहाळ करण्याऱ्या अहिरवाडी येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशा मागणीचे निवेदन अहिरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई तायडे यांनी रावेर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी के. पी.वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
(ads)
सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत सन २०२२-२०२३ रस्ता काँक्रिट करण्यात आला होता.अहिरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई तायडे यांनी दिनांक २ऑक्टोबर २०२५ रोजी माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली होती. परंतु ग्रामसेवक यांनी वेळेच्या मुदतीत सदर माहिती मुदतीत दिली नसल्याने रेखाबाई तायडे यांनी अपील सादर केली होती.परंतु अपिलात सदर माहितीचे दप्तर उपलब्ध नसल्याने अर्ज निकाली काढण्यात आला आहे असे पत्राद्वारे सांगण्यात आले. असे रेखाबाई तायडे यांनी सुवर्ण दिप शी बोलतांना सांगितले.
(ads)
ग्राम पंचायत सदस्य रेखाबाई तायडे यांचे म्हणणे असे आहे की, मी ग्रामसेवक आणि सरपंच यांना तोंडी कागदपत्राची मागणी केली असता सरपंच सुनीता नागेश्वर चौधरी यांनी मला असे म्हटले की,तुमच्या दलीत वस्तीचे काम करणारे ठेकेदार जोपर्यंत कमिशन देत नाही. तोपर्यंत कागदपत्रे देणार नाही.असे मला म्हटले. यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने कागदपत्रे गहाळ केल्याचे समजते असा गंभीर आरोप ग्राम पंचायत सदस्य रेखाबाई तायडे यांनी केला.
(ads)
तरी आठ दिवसाच्या आत सदर प्रकरणाचा तपास करून त्यांचेवर कारवाई करावी अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनाची प्रत जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आर पी आय जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी,आर पी आय रावेर तालुका अध्यक्ष विकिभाऊ तायडे यांना रवाना केल्या आहेत.



