पुणे (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : पुणे येथील दिनांक १८/१२/२५ रोजी आय. बी. शासकीय विश्राम गृह येथे नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम ची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार हे होते तर राज्य संघटक पदमा मोहड , बुलढाणा जिल्हा सदस्य कैलास खराटे हे पदाधिकारी उपस्थित होते.
(ads)
बैठकीत संघटनेच्या वतीने प्रकाश सरदार यांनी बैठकीत पुणे येथील उपस्थित पत्रकारांची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष ज्योती गायकवाड, जिल्हा सचिव दिनेश परमार, उपाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा संघटक गौतम भंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन कोरे, जिल्हा कोषाध्यक्ष शहाबाज शेख, कायदेशीर सल्लागार अँड. सागर बहिरुणे व ॲड .त्रिरत्ना बागुल, जिल्हा सदस्य राहुल हातोले, अब्दुल बादखान , आम्रपाली खराटे या प्रमाणे आहे.बैठकीत सूत्रसंचालन व आभार पुणे विभागीय अध्यक्ष तुकाराम एस. खाजेकर यांनी केले.




