भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे २५ डिसेंबर २०२५ रोजी महिला समता सैनिक दलाचे शिबिर तर २६ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व जिल्हा*च्या वतीने आयोजित *जिल्हास्तरीय महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप* आणि *महिला धम्म मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या मेळाव्यात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता, ज्यामुळे उपस्थिती लक्षणीय झाली होती.
(ads)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध आणि *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक त्रिशरण , पंचशील घेण्यात आली.
मेळाव्याच्या अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थिती अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रियंका अहिरे स्वागताध्यक्ष सुमंगल अहिरे प्रमुख उपस्थित व्यक्तींमध्ये राज्य संघटक लता तायडे, प्रचार आणि पर्यटन सचिव के. वाय. सुरवाडे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार आणि सुशीलकुमार हिवाळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शमिबा पाटील बौद्धजन परिषदेचे अध्यक्ष एन.टी. इंगळे जळगाव पश्चिमचे महिला अध्यक्ष मंगला सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात प्रास्तविक महिला जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार आणि सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले.
(ads)
सर्व प्रथम भंतेजी च सरदार परिवाराकडून पुष्प वर्षाव करून स्वागत केले.त्यानंतर महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे यांचे स्वागत भुसावळ तालुका कार्यकारणी यांनी केला.प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे स्वागत जळगाव जिल्हा महिला व पुरुष यांनी भव्य स्वागत केले, उर्वरित सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
(ads)
२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरी सर्व धम्म सेवक याचा सन्मान
या मेळाव्यात करण्यात आला. तसेच २०२५ या वर्षभरात महिला उपासिका आणि समता सैनिक दल शिबिर राबवणाऱ्या तालुक्यांतील महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वाधिक शिबिर राबवणाऱ्या तालुक्यांची क्रमवारी मुक्ताईनगर तालुका (प्रथम क्रमांक),बोदवड तालुका (दुसरा क्रमांक),जामनेर तालुका (तिसरा क्रमांक),याशिवाय भुसावळ,जळगाव आणि रावेर तालुक्यांमध्येही शिबिर राबवण्यात आली होती. या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक व सत्कार करण्यात आला.
(ads)
या मेळाव्याला प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की,
> भारतीय राज्यघटनेने आणि धम्माने महिला व पुरुष यांना *समान अधिकार** दिले आहेत. त्याप्रमाणे दोघांनाही *एकसमान पातळीवर* मोजले पाहिजे.
> महिलांनी आता *कोणत्याही क्षेत्रात* मागे राहू नये, असे आव्हान त्यांनी उपस्थित महिलांना केले.
(ads)
शिबिरातील प्रशिक्षक आणि केंद्रीय शिक्षिका
समता सैनिक दलाचे महिला प्रशिक्षक लेफ्टनंट कर्नल मीना झिने (जालना) आणि लेफ्टनंट कर्नल रमेश साळव- विविध तालुक्यांतील महिला धम्म प्रशिक्षण शिबिरांना मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रीय शिक्षिका
- फुलगाव :करुणा नरवाडे, कपिलनगर : वैशाली सरदार,- निंभोरा : ज्योती कुंटे
,फेकरी : सीमा अहिरे,भुसावळ पंचशील नगर : प्रियंका अहिरे, - खडका : सुमित्रा सर्वटकर,
- यावल : लता तायडे,- जामनेर :उषा शिरसाठ याचा सन्मान सत्कार करण्यात आला.
(ads)
या मेळाव्याने महिलांना धम्म, समता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने प्रेरित केले असून, या मेळाव्याला सर्व महिला व पुरुष जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सुमित्रा सर्वटकर, सुनीता वानखेडे, करुणा नरवाडे, सुषमा इंगळे, आशा पोहेकर, छाया सुरवाडे, कविता सुरवाडे, विद्या झनके, वनिता साळवे, वनमाला हिवाळे, सिंधू निकम, रंजू ठाकरे, भारती तायडे, ललिता बोदडे, प्रज्ञा वाघ,वसुंधरा मेढे, कुसुम गायकवाड, अनिता सपकाळे, संजीवकुमार साळवे, प्रकाश सरदार, पंडित सपकाळे शैलेंद्र जाधव, संघरत्न दामोदरे, भिमराव पवार,वसंतदादा लोखंडे, सुनील अढागडे, प्रमोद पोहेकर, डॉ. सचिन नरवाडे, सुभाष सपकाळे, ए. टी. सुरडकर, उत्तम सुरवाडे, उत्तम खराटे,विजय अवसरमल, बी. एस. पवार, सुदान करणकाळ, दिलीप पोहेकर, बी.के.बोदडे, चंद्रकान वाघ, जयपाल लोखंडे,ले.कर्नल युवराज नरवाडे, प्रवीण डांगे, अरुण तायडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
(ads)
कार्यक्रम यशस्विते साठी माता रमाई ग्रुप, बौद्धजन परिषद,त्रिरत्न बुद्ध विहार,निंभोरा चंदा खंडारे, ऊषा सुरवाडे, वैशाली जाधव, प्रद्मा मेश्राम, रंजना तांबे, प्रद्मा खंडारे, लीला चतुर, माया बोदडे, संगीता नरवाडे, रत्नमाला जमदाडे, रमेश खंडारे, प्रकाश तायडे,अजय वाघ, बंटी सरदार,प्रणव मेश्राम, तरुण गवई, निखिल मेश्राम, निखिल नरवाडे यांनी केले.
शेवटी आभार प्रदर्शन संजीवकुमार साळवे यांनी केले.भविष्यात अशा कार्यक्रमांना अधिक विस्तार देण्याचे संकेत या मेळाव्या मुळे मिळाले आहेत.



