ट्रान्सजेंडर अभ्यास व सामाजिक कार्य क्षेत्रात भुसावळ महाराष्ट्र येथील पारलिंगी सामाजिक कार्यकर्ता चाँद जयबून बी सरवर तडवी यांना मानद डॉक्टरेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ट्रान्सजेंडर अभ्यास आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील डॉ. चांद जयबन सरवर तडवी यांना मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate Award) प्रदान करण्यात आली आहे. ही मान्यता नालंदा NIRC युनिव्हर्सिटी (Global Honorary Research Institution), पंजाब यांच्या वतीने दिनांक २५ डिसे २०२५ रोजी पुणे येथे देण्यात आली.

(ads)

डॉ. तडवी यांनी ट्रान्सजेंडर समुदायाच्या सांस्कृतिक परंपरा, ओळख, सामाजिक परिवर्तन आणि समकालीन प्रश्नांवर केलेले अभ्यासपूर्ण कार्य, तसेच समाजसेवेतील सातत्यपूर्ण योगदान याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

नालंदा NIRC युनिव्हर्सिटीने ही मानद डॉक्टरेट सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, समर्पण आणि समाजहितासाठी दिलेल्या सेवेच्या गौरवार्थ देण्यात येत आला आहे.

(ads)

हा सन्मान २५ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला. यामुळे ट्रान्सजेंडर अभ्यास व सामाजिक कार्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संशोधक, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांना नवी प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया विविध सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे.

(ads)

डॉ. चांद तडवी यांच्या या सन्मानामुळे ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्क, अस्मिता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!