जळगाव - भारत हा स्वतंत्र देश आहे, देशाचा भूभाग स्वतंत्र आहे परंतु या देशातल्या जनतेचा विचार करता वंचितांचे,गोरगरिबांचे स्वातंत्र्य व्यवस्थेने हिरावून घेतले जात तसेच संविधानाचे उल्लंघन वेळोवेळी केले जात आहे तेंव्हा आपल्या देशात देशाचे संविधान सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे मत जागतिक दर्जाचे चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केले. दिनांक २९/३० नोव्हेंबर असे दोनदिवसीय संमेलनाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
स्वागताध्यक्ष करील सालार यांनी दोन दिवसीय संमेलनास आलेल्या वक्त्यांकडून संविधानाविषयी बऱ्याच गोष्टी शिकलो. या हृदयीचे त्या हृदयी विचारांची देवाण-घेवाण झाल्याचे नमूद केले.
प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी 2008 पासून संविधानावर चर्चा घडवून त्या दिवसापासून संविधान दिवस साजरा केला जात असल्याचे सांगून संविधानाच्या पुनर्विलोकनाची भाषा वारंवार केली जाते मात्र त्याची गरज नसल्याचे यांनी सांगितले. संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त अनेकांनी अनेक कार्यक्रम संविधानाच्या अनुषंगाने घेतले. ती एकदिवशीय होती व ते सर्व कार्यक्रम आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतले मात्र हे संमेलन आंबेडकरी आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी हातात हात घालून यशस्वी केल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी एकूण १८ ठरावाचे वाचन डॉ. मिलिंद बागुल यांनी केले ठरावाच्या माध्यमातून संविधान विरोधी शासकीय , न्यायालयीन , पक्षीय पातळीवर घडणाऱ्या घटनांची नोंद करण्यात आली व शासनाने त्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात असेल .
मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी प्रजासत्ताक दिन दुप्पट ताकदीने यापुढे साजरा करावा अशी अपेक्षा अध्यक्षस्थानावरून व्यक्त केली. संविधानाच्या सन्मानार्थ प्रत्येकाने झोकून देऊन स्वतःच्या कामाचे ऑडिट करण्याची अपेक्षा व्यक्त केली व मी किमान ५० संविधानवादी नागरिक तयार करणार हा विचार संमेलनातून प्रत्येकाने घेऊन जावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी शिवराम शिरसाट संकलित आठवणी संमेलनाच्या संकलनाचे प्रकाशन करण्यात आले तसेच संमेलनाच्या यशस्वीते करिता परिश्रम करणाऱ्या १५० कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र केदार, चेतन नन्नवरे, भारती रंधे , नीलू इंगळे , संध्या तायडे , जगदीश सपकाळे, प्रा. प्रीतीलाल पवार, ॲड. आनंद कोचुरे , ॲड. आकाश सपकाळे व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.सत्यजित साळवे यांनी तर आभार प्रदर्शन बापूराव पानपाटील यांनी केले .
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात राज्यभरातून मोठयाप्रमाणात लोकांनी तसेच ग्रंथ विक्रेत्यांनी हजेरी लावली .


