जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
ब्लू बर्ड बिझनेस आणि सोशल ऑर्गनायझेशनच्या जळगाव विभागातर्फे एका थ्री स्टार हॉटेल मध्ये भव्य बिझनेस मीट आणि संस्थेच्या अधिकृत ऑनलाइन मोफत ॲपचे चॅप्टर लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील उद्योगपती ,व्यावसयिक, नव उद्योगपती सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रम दोन सत्रामध्ये करण्यात आला होता. प्रथम सत्रात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ९ वाजता भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, सर्वांना सामुदायिक त्रिशरण-पंचशील केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार यांनी देऊन सुरवात केली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड.राजेश झाल्टे, ब्ल्यू बर्ड चे संस्थापक/अध्यक्ष रंजीत फुले,महाराष्ट्राचे समन्वयक ॲड.त्रिरत्ना बागूल, उद्योगपती संजय इंगळे, ॲड. सागर बहिरूणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली.
या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित सर्व व्यवसायिकांचा सविस्तर परिचय घेण्यात आला. त्यांच्या उद्योग व व्यवसायाची सध्याची स्थिती, भविष्यातील योजना आणि येणाऱ्या अडचणींवर खुल्या मनाने चर्चा झाली.
मुख्य चर्चेचे मुद्दे - व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक भांडवल कसे उभारावे? केंद्र व राज्य शासनाच्या विविध कर्ज योजनांची सखोल माहिती व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रम कुठे व कसे मिळवावेत? - मोठ्या उद्योजकांनी सूक्ष्म-मध्यम उद्योजकांना कशाप्रकारे साथ द्यावी? - यशस्वी उद्योजक घडविण्याची गुरुकिल्ली काय?
अनुभवी उद्योजक व तज्ज्ञांनी आपले अनुभव कथन करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे सत्र अत्यंत प्रेरणादायी व माहितीपूर्ण ठरले.
दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता – ॲप चॅप्टर लॉन्चिंग
दुपारी ठीक ३ वाजता ब्लू बर्ड बिझनेस आणि सोशल ऑर्गनायझेशनचे अधिकृत ऑनलाइन ॲपचे जळगाव चॅप्टर मान्यवरांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले.
ॲपची वैशिष्ट्ये व फायदे याची माहिती व्यवसायिकांचा व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोफत रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क नाही- व्यवसायाची जाहिरात, नेटवर्किंग, नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे संस्थेच्या सर्व सदस्यांना एकाच छताखाली सर्व सेवा व उद्योग जोडणे
कार्यक्रमात उपस्थित सर्व व्यवसायिकांनी तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून आपला व्यवसाय मोफत रजिस्टर केला. डिजिटल युगात व्यवसाय वाढविण्याचे हे प्रभावी माध्यम असल्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
*जळगाव जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर*
कार्यक्रमाच्या शेवटी जळगाव जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी संस्थापक/अध्यक्ष रंजीत फुले यांनी घोषीत केली. ती पुढील प्रमाणे आहे
जिल्हा अध्यक्ष पदी ॲड. सागर बहिरूणे
जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सरदार व युवराज वाघ , जिल्हा सचिव . सीमा कोतकर, जिल्हा कोषाध्यक्ष –ॲड. सुनील इंगळे,जिल्हा कोषाध्यक्ष – ॲड. अभिजीत लोखंडे ,जिल्हा कार्याध्यक्ष बुद्धभूषण सपकाळे , सहसचिव सिद्धार्थ भिमडे, सहसचिव चेतन नन्नवरे, सहसचिव दिनेश इखारे, सहसचिव विक्रांत बांगर
*जळगांव तालुका समन्वयक*
डॉ. उल्हास तासखेडकर, ॲड कमलाकर शिरसाट, विजय बागुल, विवेक सैंदाणे, ॲड चेतन वाघ
*भुसावळ तालुका समन्वयक*
दिनेश इखारे, राहुल कुचेकर ,
गजानन निंबाळकर
*पाचोरा तालुका समन्वयक*
सागर पवार
*रावेर तालुका समन्वयक*
चंद्रकांत गाढे
*यावल तालुका समन्वयक*
युवराज सोनवणे
*अमळनेर तालुका समन्वयक*
एन. टी. वाघ
*पारोळा तालुका समन्वयक*
जगन्नाथ सरदार
*जामनेर तालुका समन्वयक*
दादाराव वाघ, बबलू जाधव
*चाळीसगाव तालुका समन्वयक*
आम्रपाली मोरे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सरदार, ॲड. अभिजीत लोखंडे, ॲड. सुनील इंगळे, ॲड. कमलाकर शिरसाट, श्री. युवराज सोनवणे, दिनेश इखारे यांनी तर आभार प्रदर्शन युवराज वाघ यांनी केले.ब्लू बर्ड बिझनेस आणि सोशल ऑर्गनायझेशनचे हे पाऊल जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना एका मजबूत व्यासपीठावर आणण्यात व त्यांचा व्यवसाय डिजिटल पद्धतीने वाढविण्यात निश्चितच मोलाचे ठरणार असून त्यांना उद्योगात सक्षम करेल. कार्यक्रमाच्या शेवटी सरणथ्या घेऊन समारोप करण्यात आला.




