ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लेवा- गणबोली दिवस' मराठी विभागामार्फत साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . ज. बा. अंजने उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभागातील विषय शिक्षक प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे हजर होते.
(ads)
सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रा.डॉ.महेंद्र सोनवणे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. बहिणाबाई यांनी लिहिलेल्या कविता या लेवा गणबोलीतील असून बहिणाबाईंची गाणी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज. बा. अंजने यांनी बहिणाबाईंच्या कवितेतून अभिव्यक्त झालेले तत्वज्ञान हे वास्तव जीवनातील असून त्यांच्या आचार आणि विचारातून व्यक्त झालेले आहेत, असे सांगितले.
(ads)
सदर प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मानले.


