रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
रावेर येथील फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
(ads)
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून दिप व धुप पुजन केली. यावेळी केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांनी उपस्थित मान्यवरांना त्रिशरण व पंचशील दिले. यावेळी फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी प्रस्ताविक मांडले .
(ads)
या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कोंघे, रमेश तायडे, बाळू शिरतुरे, एडवोकेट योगेश गजरे, सामाजिक कार्यकर्ते पंकज वाघ, एडवोकेट दीपक तायडे, बौद्धाचार्य सदाशिव निकम, सिताराम पाटील, संतोष चौधरी, सतीश सूर्यवंशी, संतोष कदम, ईश्वर जाधव, किशोर चौधरी यांच्यासह वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जितेंद्र साबळे यांनी मानले.


