ऐनपूर : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते.
(ads)
या प्रसंगी प्राचार्य डॉ.जे.बी अंजने यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा उल्लेख करताना त्यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता स्पष्ट केली. सामाजिक समता, शिक्षण आणि लोकशाही मूल्यांबाबत बाबासाहेबांनी दाखविलेला मार्ग आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
(ads)
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते धनाजी नाना महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. नरेंद्र मुळे होते. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत, बाबासाहेबांनी आजीवन सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढा दिल्याचे अधोरेखित केले.
(ads)
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला.


