साळवे इंग्रजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी मौन पाळत त्यांना आदरांजली वाहिली.
(ads)
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. मोरे, कार्यक्रम समिती प्रमुख सौ. रंजना नेहेते, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. एस. कायंदे उपस्थित होते. याशिवाय जी. व्ही. नारखेडे, एस. पी. तायडे, एस. व्ही. राठोड, डी. जे. पाटील, ए. वाय. सिंगाने, बी. आर. बोरोले, सौ. नीता पाटील, गुणवंती पाटील, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते आणि विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(ads)
विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित भाषणे, गीत व सांस्कृतिक सादरीकरणे करून सामाजिक समता, बंधुता व न्याय यांचा संदेश दिला. प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संविधान निर्मात्यांच्या विचारांचे अनुकरण करून शिक्षण, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एस कायंदे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब यांनी संविधान निर्मिती करून जगामध्ये देशाचे नाव स्थान उंचावून देशांमध्ये समानता व शांतता प्रस्थापित करण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे.
(ads)
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन कार्यक्रम समिती प्रमुख सौ रंजना नेहेते व सहकार्यांनी उत्साहात पार पाडले. आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक जी व्ही नारखेड यांनी केले.


