मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राज्यातून आलेल्या अनुयायांनी हजारो ग्रंथ खरेदी केली.
दरवर्षी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी दादर येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात.
(ads)
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सवलतीच्या दरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ शिवाजी पार्क मैदानात बार्टी बुक स्टॉल वर उपलब्ध करून देण्यात आली होती.
(ads)
बार्टी बुक स्टॉलचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून करण्यात आले. मंत्रीमहोदय यांच्या हस्ते अनुयायांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आले.
(ads)
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम उपजिल्हाधीकारी सिद्धार्थ भंडारे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, लेखाधिकारी नितिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि बार्टी संस्थेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
(ads)
बार्टीच्यावतिने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना दिनांक ५ व ६ डिसेंबर रोजी बुक स्टॉलवर ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दिनांक ५ , ६ डिसेंबर रोजी अनुयायांना भोजन, आणि पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
(ads)
चैत्यभूमी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मंत्री संजय शिरसाठ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
(ads)
भीम अनुयायांना सेवा देण्यासाठी गेल्या तिन दिवसांपासून बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. यंदा भारतीय संविधानाचा अमॄत महोत्सव असल्यामुळे अनुयायांनी मोठ्या प्रमाणात संविधान प्रती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड खरेदी करून महामानवास अभिवादन केले.


